लोकप्रिय गायक आणि रॅपर हनी सिंह आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे.
रॅपरने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेट दिली आहे.
हनी सिंहच्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंट्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हनी सिंहच्या आयुष्यावर आधारित असलेली डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
रॅपरने डॉक्युमेंट्रीची घोषणा करत लिहिलं आहे,माझ्या आयुष्यासंबंधित अनेक गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता हनी आजारी आहे आणि डॉक्युमेंट्री तयार आहे.
हनी सिंहच्या डॉक्युमेंट्रीचं दिग्दर्शन मोजेज सिंहने केलं आहे.
देशातला सगळ्यात मोठा रॅपर बनण्याचा हनी सिंहचा प्रवास या डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवण्यात येणार आहे.
हनी सिंहने नुकतचं 3.0 या म्यूझिक अल्बमच्या माध्यमातून त्याने कमबॅक केलं आहे.
हनी सिंहची 'ब्राउन रंग', 'देसी कलाकार' आणि 'ब्लू आईस' सारखी अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत.
हनी सिंहच्या आयुष्यावर आधारित असलेल्या डॉक्युमेंट्रीची चाहत्यांना उत्सुकता आहे.