बहुतांश घरात शेवग्याच्या शेंगा आणि त्याच्या पानांचा उपयोग केला जातो.

शेवग्याची शेंग आपण सांबर किंवा डाळीत घालून खातो.

शेवग्याच्या शेंगेनं जेवणाला एक वेगळीच चव येते.

फक्त शेवग्याच्या शेंगा नाहीत तर त्याच्या पानांची भाजी देखील बनवण्यात येते.

शेवग्याच्या शेंगेत सहजन विटामिन सी, विटामिन ई, कॅल्शियम, पोटॅशियम आणि आयरन मोठ्या प्रमाणात असतात.

शेवग्याची शेंगा खाण्याचे फायदे

शेवग्याच्या शेंगचे सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रित राहतो.

शेवग्याची शेंग खाल्यानं त्वचेला अनेक फायदे होतात.

शेवग्याची शेंग खाल्ल्यानं अंग दुखी आणि सूज येण्याची समस्या दूर होते.

जो अवयव दुखत असेल तेथे शेवग्याच्या शेंगची पाने लावल्यानं सूज आणि दुखणे देखील जाते.

शेवग्याच्या शेंगाचे सेवन केल्यास हृदयाशी संबंधित आजारांचा धोका दूर राहतो.