आजकाल प्रत्येक व्यक्ती तणावाने त्रस्त आहे. तणाव ही एक अशी समस्या आहे, जी शरीरात अनेक आजारांना जन्म देते. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात तणाव वाटत असेल, तर ‘अशा’ प्रकारे तणावावर मात करण्याचा प्रयत्न करा.
तुमच्या दैनंदिन दिनचर्येतून विश्रांती घ्या आणि तुम्हाला आवडेल अशा ठिकाणी फिरायला जा. यामुळे तुमचा मूड फ्रेश होतो आणि तुम्ही थकवा, तणाव आणि चिंता यापासून दूर राहता.
निसर्गाचा अनुभव घ्या आणि निसर्गाच्या जवळ जा. उद्यानात किंवा हिरवळ असलेल्या ठिकाणी थोडा वेळ घालवा. जेव्हा, तुम्ही सर्व चिंता सोडून निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवता, तेव्हा तुमचे शरीर प्रसन्न होते.
जेव्हा, तुम्हाला काहीच समजत नाही आणि तणाव जाणवत असेल, तेव्हा सर्वकाही सोडून द्या आणि तुमचे आवडते संगीत किंवा गाणे ऐका. जर, तुम्हाला नृत्य आवडत असेल, तर नृत्य करा. संगीतात अशी शक्ती असते, जी तुमच्या शरीरातील आनंद वाढवते.
मित्रांसोबत किंवा ज्यांच्याशी तुम्हाला बोलायला मजा येते, त्यांच्यासोबत वेळ घालवा. त्यांच्याशी तुमच्या मनातील गोष्टी शेअर करा. जुन्या गोड आठवणींना उजाळा द्या.
जीवनात अनेक वेळा वेळेअभावी किंवा व्यस्ततेमुळे तणावही वाढतो. यासाठी तुमची दिनचर्या सुनियोजित करा. वेळेवर उठा, व्यायाम करा, मॉर्निंग वॉकला जा, घराची साफसफाई करा.
तुम्हाला आनंद देणारे काहीतरी करा. तुम्हाला खरेदी आवडत असेल, तर खरेदीला जा. फोटोग्राफी, चित्रकला, नृत्य किंवा जे काही तुम्हाला आवडते ते करा.