निखळ हास्य अन् घायाळ करणाऱ्या अदा... टेलिव्हिजन दिव्यांक त्रिपाठ नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. काही दिवसांपूर्वी दिव्यांकानं आपल्या नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. दिव्यांताचा शरारा लूक सर्वांना आवडत असून तिच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. या फोटोंमध्ये दिव्यांकानं शरारा सूट वेअर केला आहे. त्यासोबत तिनं गळ्यात हेव्ही चोकर घातला आहे. ज्यामुळे तिचं सौंदर्य आणखी खुललं आहे. दिव्यांकानं केस मोकळे सोडले आहेत. तसेच फोटोमध्ये तिनं तिच्या निखळ हास्यानं सर्वांचीच मनं जिंकली आहेत. दिव्यांका सध्या आपल्या कामात बिझी आहे.