दिव्या खोसला कुमारलानं नुकतेच तिच्या रॉयल लूकमधील फोटो शेअर केले. हा लूक दिव्यानं लॅकमे- फॅशन विकसाठी केला होता. लॅकमे फॅशन विकमध्ये दिव्यानं वॉक केला. ऑफ व्हाईट कलरचा लेहेंगा, त्यावर प्रिंटेड जॅकेट, स्टोन आणि मोत्यांची ज्वेलरी असा लूक दिव्यानं केला होता. दिव्याच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. दिव्यानं शेअर केलेल्या उर्वशी रौतेला, हॅरी आनंद या सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. लॅकमे फॅशन विकमधील वॉक झाल्यानंतरचे फोटो दिव्यानं शेअर केले. फोटोला दिव्यानं कॅप्शन दिलं, 'पोस्ट शो'