फिटनेस फ्रीक दिशा पटानी अनेकदा जिममध्ये तर कधी जिमच्या बाहेर स्पॉट होते. दिशा तिचे व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच दिशाने तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दिशा 90 च्या दशकातील फॅशन दाखवत आहे. या फोटोंमध्ये दिशाने काळ्या रंगाचा हॉल्टरनेक कॉर्सेट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. दिशाने बोल्ड मेक-अप केला आहे. रेट्रो लुक पूर्ण करण्यासाठी दिशाने शॉर्ट आणि ओपन हेअरस्टाइल ठेवली आहे. या फोटोंमध्ये दिशाने कोणतेही दागिने घातलेले नाहीत.