अभिनेत्री दिशा पाटनी ही लवकरच एक व्हिलन रिटर्न्स या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
दिशा तिच्या अभिनयानं आणि फिटनेसनं नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळाली.
ब्लॉकबस्टर ठरलेल्या पुष्पा या चित्रपटातील Oo Antava या गाण्याची ऑफर दिशाला देण्यात आली होती. पण दिशानं या गाण्याची ऑफर नाकारली.
लायगर या चित्रपटातील प्रमुख भूमिकेची ऑफर देखील दिशानं नाकारली. रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे कथानक दिशाला आवडले नाही त्यामुळे या चित्रपटात काम करण्यास दिशानं नकार दिला.
‘मिशन मंगल’ या चित्रपटाची ऑफर देखील दिशानं नाकारली. या चित्रपटामध्ये विद्या बालन, अक्षय कुमार यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
‘मर्डर 4’ या बिग बजेट चित्रपटांमध्ये काम करण्यास देखील दिशानं नकार दिला.
‘बागी 2’, ‘मलंग’, ‘भारत’,‘राधे’ या हिट चित्रपटांमधून दिशा प्रेक्षकांच्या भेटीस आली.
अनेक वेळा दिशाचे नाव अभिनेता टायगर श्रॉफसोबत जोडण्यात आले. पण दिशा आणि टागरनं त्यांच्या नात्याबाबत अजून कोणतीही माहिती चाहत्यांना दिलेली नाही.
‘लोफर’ या तेलगु चित्रपटांमधून दिशानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. दिशाचा एक व्हिलन रिटर्न्स हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
दिशाचा एक व्हिलन रिटर्न्स हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये दिशासोबतच अभिनेत्री तारा सुतारिया आणि अभिनेता अर्जुन कपूर हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत.