काही डाळी वेळेवर खाल्ल्या नाहीत तर गॅस किंवा इतर संबंधित समस्या उद्भवू शकतात.

हिवाळ्यात सर्वजण मूग खातात. ही एक अशी डाळ आहे जी आरोग्याशी संबंधित प्रत्येक समस्यांमध्ये लोक या डाळीचे सेवन करतात.

मूग डाळीमध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे असे अनेक पोषक घटक असतात. ही डाळ खाल्ल्याने रक्तदाबही नियंत्रणात राहतो.

मात्र, काही लोकांसाठी मूग डाळीचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

मूग डाळ सर्वांनाच आवडते. परंतु ज्यांना रक्तदाब कमी आहे त्यांनी ती डाळ खाणे टाळावे.

कारण उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मूग डाळ फायदेशीर ठरू शकते.

जे युरिक अॅसिडचे रुग्ण आहेत त्यांनीही मूग डाळ टाळावी. मुगाच्या डाळीमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.

म्हणूनच जर तुम्ही ही डाळ खाल्ले तर तुमच्या शरीरातील युरिक अॅसिडची पातळी आणखी वाढू शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.