मुलतानी मातीचा त्वचेसाठी वापर आणि त्याचे फायदे अनेकांना ठाऊक आहेत. मुलतानी माती तेलकट आणि मुरुमाच्या समस्येवर खूप फायदेशीर आहे.
मुलतानी माती नुकसानकारक बॅक्टेरिया, त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि धूळ-माती हटवण्यास मदत करतात.
नियमितपणे मुलतानी मातीचा वापर केल्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मुलायम राहते. चेहऱ्यावर मुरुमांच्या समस्येवर मुलतानी उत्तम उपाय आहे.
मुलतानी माती सुंदर आणि तजेलदार त्वचेसाठी रामबाण उपाय आहे. याचा आणखी प्रभावी वापर करण्यासाठी तुम्ही घरी उपलब्ध असणाऱ्या या गोष्टी मिसळून फेस पॅक बनवू शकता.
अंडी आणि मुलतानी मातीचा फेस पॅक खूप फायदेशीर आहे. अंड्याचा पांढरा भाग त्वचेसाठी फायदेशीर आहे. यामुळे सैल त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळेल.
बदाम दुधामध्ये मिसळून त्याची पेस्ट आणि मुलतानी माती यांच्या फेस पॅक बनवा. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार होईल.
मुलतानी माती आणि टोमॅटोचा रस हा एक उत्तम फेस पॅक आहे. हे खूप चांगले एक्सफोलिएंट आहे, यामुळे तुमची त्वचा डाग मुक्त होईल.
ज्यांना टॅनिंग आणि ब्लॅक स्पॉट्सची समस्या आहे, त्यांच्यासाठी मध आणि मुलतानी मातीचा फेस पॅक सर्वोत्तम आहे. यामुळे त्वचेची हरवलेली चमक परत येईल.
मुलतानी माती आणि गुलाबपाणी चेहऱ्यावर खूप फायदेशीर आहे. त्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. मुरुमांची समस्या देखील दूर करते.
मुलतानी मातीचे हे सोपे आणि घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा. चांगला परिणामासाठी आठवड्यातून किमान दोन वेळा फेस पॅक वापरा.