शेंगदाण्यामध्ये असलेले पोषक तत्वही आपल्याला मिळतात. हे पोषक तत्व आपल्याला हिवाळ्यात अनेक आजारांपासून वाचवतात.

शेंगदाणे केवळ शरीराल ऊर्जा देण्याचे काम करत नाही तर, अनेक आजारांपासून दूरही ठेवतात.

शेंगदाण्यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात.

टाईमपास म्हणून खाल्लेल्या शेंगदाण्यात अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

शेंगदाणे खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमचे वजनही नियंत्रित करता येऊ शकते.

शेंगदाण्यात अनेक प्रकारचे अॅंटीऑक्सिडेंट असतात. जे शरीरातील हृदयविकाराचे दुखणे दूर करण्यास मदत करतात.

शेंगदाणे खाल्ल्या कर्करोगावर धोका कमी प्रमाणात करता येतो. शेंगदाण्यामध्ये फायटोस्टेरॉल नावाचा घटक मुबलक प्रमाणात आढळतो, जो शरीराला कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून दूर ठेवतो.

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी शेंगदाण्याचा वापर केला जातो. शेंगदाण्यात मॅगनीजसह अनेक खनिजे आढळतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.