जर तुम्हीसुद्धा सकाळी पोट साफ न होण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर आम्ही तुम्हाला काही पदार्थांची नावे सांगणार आहोत. हे पदार्थ रोज खाल्ल्याने तुमचे पोटही साफ होईल.
खजूर तुमच्या पोटासाठी फार चांगले मानले जाते. यासाठी दररोज 2 ते 3 खजूर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी नाश्त्यापूर्वी त्याचे सेवन करा.
जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास वाढत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मेथीदाण्यांचे चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्या.
मेथीचे दाणे आरोग्यासाठी चांगले मानले जातात. यामुळे तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील.
बद्धकोष्ठता दूर ठेवण्याबरोबरच आवळा आरोग्याच्या अनेक समस्यांपासून बचाव करतो. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी आवळा खा.
जर बद्धकोष्ठतेची समस्या जास्त जाणवत असेल तर तुम्ही जेवणात किंवा सूपमध्ये आवळ्याचा वापर केला तरी चालेल.
देशी गाईचे शुद्ध तूप पचनसंस्थेसाठी रामबाण औषधासारखे काम करते.
गाईचे तूप सकाळी दूध किंवा चहामध्ये घालून सेवन करू शकता. यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्ती मिळेल.
रात्री पाण्यात भिजवलेले 5 ते 10 मनुके सकाळी रिकाम्या पोटी खा. यामुळे सुद्धा तुमचा बद्धकोष्टतेचा त्रास दूर होईल.
जर तुम्ही या पदार्थांचे सेवन केले तर तुमची बद्धकोष्टतेची समस्या काही दिवसांतच दूर होईल.