अमेरिकेच्या एडविन एल ड्रेक यांनी पहिल्यांदा तेल विहीर शोधली होती.



1859 मध्ये अमेरिकेत जगातील पहिली तेल विहीर खोदण्यात आली



त्यानंतर जगातील अन्य देशांमध्ये तेल विहिरींचा शोध सुरू झाला.



सध्या आखाती देशात सर्वाधिक तेल विहिरी आहेत.



आखाती देशातून जगाला कच्च्या तेलाची सर्वाधिक निर्यात होते.



भारतात सगळ्यात पहिल्या तेल विहिरीचा शोध लागला हे माहीत आहे का?



आसाममधील डिगबोईमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तेल विहिरीचा शोध लागला.



भारतातील पहिली तेल विहीर 1889 मध्ये खोदण्यात आली. 1890 मध्ये हे काम पूर्ण झाले.



आसाम रेल्वे अॅण्ड ट्रेडिंग कंपनी लिमिटेड या कंपनीकडून विहीर खोदण्यात आली.
ही कंपनी लंडनमध्ये नोंदणीकृत होती.


डिगबोई शहर हे आसाममधील कच्च्या तेलाचे शहर म्हणून ओळखले जाते.