दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत मुलगी ऐश्वर्याच्या घरातून लाखो रुपये किंमतीचे दागिने चोरीला या प्रकरणी ऐश्वर्याने तीनमपेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत. चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये डायमंडचा हार, अॅंटिक सोन्याचे दागिने, नवरत्न सेट, अॅंटिक डायमंड सेट, आरम नेकलेस आणि बांगड्यांचा समावेश आहे. बहिणीच्या लग्नात दागिने वापरल्यानंतर ते लॉकरमध्ये ठेवले असल्याचं ऐश्वर्याने सांगितलं. या दागिन्यांची किंमत 3.60 लाख असल्याची नोंद तक्रारीत करण्यात आली आहे. आयपीसी कलम 381 नुसार आता पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत. चोरी झालेले दागिने ऐश्वर्याने शेवटचे 2019 साली बहिणीच्या लग्नात शेवटचे वापरले होते. पण आता हे दागिने गायब झाल्याचं लक्षात आल्यानंतर ऐश्वर्याने तक्रार दाखल केली आहे.