भूमी पेडणेकरने दम लगा के हैशा या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

या चित्रपटात ती आयुष्मान खुराना सोबत दिसली होती. या चित्रपटात दोघांनीही आपापल्या भूमिका चांगल्या प्रकारे साकारल्या.

पण ही भूमिका भूमी पेडणेकरसाठी सोपी नव्हती. कारण या चित्रपटातील भूमिचा रोल हा अतिशय जाड मुलीचा होता.

चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्यापूर्वी भूमीला 90 किलो वजन वाढवावं लागलं आणि तिने ते केलंही.

आजही 'दम लगा के हैशा'ची गणना देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये केली जाते.

मात्र, चित्रपट संपल्यानंतर भूमी पेडणेकरसाठी वजन कमी करण्याचे आव्हान होते.

रिपोर्ट्सनुसार, भूमी पेडणेकरने 4 महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर 32 किलो वजन कमी केले होते आणि ती हळूहळू परफेक्ट फॉर्ममध्ये आली होती.

भूमीचं हे बदलतं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहतेही थक्क झाले होते.

पण खास गोष्ट म्हणजे भूमी वजन कमी करण्यासाठी उपाशी राहिली नाही, तर तिने खास डाएट प्लॅन फॉलो केला.