आज 'कार्तिक पौर्णिमा' आहे. या दिवसाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.



कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला 'कार्तिक पौर्णिमा' ( Kartik Purnima ) असं म्हणतात.



आज 'कार्तिक पौर्णिमा' आहे. या दिवसाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.



याच निमित्त पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंदिर दिव्यांनी सजवण्यात आले.



मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभाऱ्यात लावलेल्या पणत्या..



. विविध प्रकारच्या फळांची केलेली आरास आणि मिठाई,



फराळाच्या तिखट-गोड पदार्थांपासून वेगवेगळ्या पदार्थांचा दगडूशेठ गणपती मंदिरात अन्नकोट मांडण्यात आला.



त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लावलेल्या 1 लाख दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता.



पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यामध्ये साठविण्यासोबतच मोबाईल कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली.



श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त



दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये 1 लाख दिव्यांचा दीपोत्सव आणि 521 मिष्टान्नांचा अन्नकोट आयोजित करण्यात आला होता.



यावेळी अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांसह ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित होते.