राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील आज आपल्या कोथरुड मतदारसंघात होते.



चंद्रकांत पाटील यांनी कर्वेनगर इथल्या विठ्ठल मंदिरात आयोजित काकड आरतीला उपस्थिती लावली.




पाटील यांनी विठू माऊलीची मनोभावे पूजा केली.

तसंच सर्वांना उत्तम आरोग्यासाठी विठूरायाच्या चरणी प्रार्थना केली.



यावेळी चंद्रकांत पाटील हे टाळ मृदंगाच्या तालावर आणि विठ्ठलाच्या नामघोषात तल्लीन झाले.



चंद्रकांत पाटील यांनी यावेळी फुगडी खेळण्याचा आनंदही लुटला.



विठू नामाच्या जयघोषात चंद्रकांत पाटील यांनी फुगडीचा फेर धरला.



चंद्रकात पाटील हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत.



2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून कोथरुड मतदारसंघातून निवडणूक लढवून चंद्रकांत पाटील विजयी झाले.



विठ्ठल मंदिरात चंद्रकांत पाटील यांचं आगळंवेगळं रुप पाहायला मिळालं.