पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी एकदिवसीय दौऱ्यावर संयुक्त अरब अमिरातीला पोहोचले आहेत.
दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यावरून पंतप्रधान आज सकाळी युएईमध्ये दाखल झाले. पंतप्रधान मोदी यांचं युएईमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं.
जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी उजळून निघाली.
बुर्ज खलिफा इमारतीवर तिरंगा, पंतप्रधान मोदींचा फोटोसह स्वागतासाठी खास संदेश झळकला.
दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाली होती.
बुर्ज खलिफावर त्यांचा फोटोसह 'पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत आहे' असं लिहिलं होतं.
बुर्ज खलिफा इमारतीवर फक्त खास प्रसंगी आणि खास लोकांसाठी असे संदेश, वेलकम नोट्स किंवा ग्रीटिंग्ज झळकतात.
बुर्ज खलिफा इमारतीवर फोटो झळकवून पंतप्रधान मोदींचे यूएईमध्ये स्वागत करण्यात आलं. आधी बुर्ज खलिफावर भारताचा राष्ट्रध्वज, नंतर पीएम मोदींचा फोटो आणि नंतर स्वागत चिठ्ठी फडकली.