बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला सेटवर प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दीपिका सध्या हैदराबादमध्ये तिच्या आगामी सिनेमाचे शूटिंग करत आहेत.

या सिनेमात दीपिका दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत दिसणार आहेत.

हैदराबादच्या रामोजी फिल्मसिटीमध्ये या सिनेमाचे शूटिंग सुरू आहे.

सेटवरच दीपिकाची प्रकृती बिघडल्याने तिला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दीपिका सध्या 'प्रोजेक्ट के' या सिनेमाचे शूटिंग करत आहे.

दीपिकाचा 'पठाण' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दीपिकाने शाहरुखसोबत तिच्या सिनेसृष्टीतील करिअरला सुरुवात केली होती.

आता पुन्हा एकदा 'पठाण'च्या माध्यमातून दोघे स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.

'पठाण' नंतर दीपिकाचा 'फायटर' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.