दीपिका पादुकोण हिने बॉलिवूड बरोबरच हॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली. आता 75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरी मेंबर्सच्या यादीत दीपिकाच्या नावाचा समावेश झाला आहे. दीपिकानं याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना माहिती दिली आहे. फ्रान्समधील प्रसिद्ध अभिनेता विंसेट लिंडन यांना फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरींचे अध्यक्ष पद देण्यात आले आहे. दीपिका ही पॅनल सदस्य असणार आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल हे या वर्षी 17 मे ते 28 मे या दरम्यान आयोजित केले जाणार आहे. फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरील सेलिब्रिटींचे लूक हे चर्चेत असतात. दीपिकानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिच्याबद्दल माहिती देण्यात आली आहे पोस्टमध्ये लिहिले आहे, 'दीपिका पादुकोण ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती प्रोड्यूसर आणि सोशल वर्कर देखील आहे.' दीपिकानं 30 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे.