सुपरस्टार यशच्या ‘केजीएफ चॅप्टर: २’ चित्रपटाला चित्रपटगृहात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. दक्षिणच नव्हेतर चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनलादेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. 14 एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता तो ओटीटीसाठी सज्ज झाला आहे चित्रपट 27 मे रोजी स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम प्रसारित होणार आहे. थिएटरमध्ये दाखल झाल्यानंतर सुमारे दीड महिन्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर येत आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राइमवर हिंदी, कन्नड, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये प्रसारित होणार आहे 2018 मध्ये आलेल्या ‘केझीएफ चॅप्टर १’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.