सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत विविध प्रकारच्या फुलांचा बहर आला आहे.



सात वर्षानंतर फुलणाऱ्या कारवी मागोमाग आंबोलीत पांढऱ्याशुभ्र फुलांनी फुललेली पठार दृष्टीस पडतात.



या फुलांना स्थानिक भाषेत 'गदा' असं म्हटलं जातं.



जुलै ते नोव्हेंबर महिन्यापर्यत आंबोलीत 150 ते 200 प्रकारची विविध रंगांची फुलं फुलतात.



आंबोली घाट, घाटमाथ्यावर, चौकुळ, कावलेसाद या ठिकाणी विविध प्रकारची रंगीबेरंगी फुलं पर्यटकांना खुणावत आहेत.



जैवविविधतेने संपन्न असलेल्या आंबोलीत मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.



आंबोलीत पर्यटकांना रंगीबेरंगी फुले, धबधबे, साप, बेडूक अशा अनेक प्रकारच्या पर्यटनाचा आनंद लुटता येतो.



कारवीची फुले आंबोली घाटाच्या दुतर्फा फुलल्याने आंबोली घाट निळ्या जांभळ्या रंगांनी न्हावून निघाला आहे.



या निळ्या जांभळ्या कारवीच्या फुलांचा रंग, आकार आणि सुगंधही वेगवेगळा असतो.



Thanks for Reading. UP NEXT

आंबोलीत निसर्गाचा अविष्कार

View next story