शक्ती मोहन नव्हे राघव जुयालला स्वीडनच्या मुलीनं केलं क्लीन बोल्ड? छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध डान्स रिएलिटी शो डान्स दिवाने 3 चा होस्ट राघव जुयाल शोमधील त्याच्या मस्तीमुळे अनेकांची मनं जिंकतो. त्याचे अनेक फॅन्सही आहेत. त्याचा डान्स विशेषत: स्लोमोशन फार प्रसिद्ध आहे. पण आता तो एका स्वीडीश मुलीला डेट करत असल्याची चर्चा सुरु आहे. संबधित मुलीचं नाव सारा अर्रहुसिस असून तिचं भारतात येणं जाणं सुरुच असतं. दरम्यान राघव आणि ती एकमेंकाना 2018 पासून डेट करत असल्याचंही समोर येत आहे. साराचं भारतातील एका कंपनीशी कामासंबधी नातं असल्यानं ती सतत भारतात ये-जा करत असते. सूत्रंच्या माहितीनुसार सारा आणि राघव एका ट्रेकवर एकमेंकाना भेटले होते. त्याच दरम्यान दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.