कढीपत्ता लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जीवनसत्त्वे बी आणि सी यांचाही चांगला स्रोत आहे. केसांच्या वाढीमध्ये कडीपत्ता फार महत्त्वाची भूमिका बजावतात. केसांची वाढ वाढवण्यासाठी आणि इतर समस्या दूर करण्यासाठी कढीपत्ता एक नव्हे तर अनेक प्रकारे वापरता येतो. केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता खूप फायदेशीर आहे. बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असल्याने कढीपत्ता केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी देखील गुणकारी आहे. जर तुमचे केस खूप निर्जीव, कोरडे आणि खराब झालेले दिसत असतील तर एका भांड्यात खोबरेल तेल गरम करून त्यात थोडी कढीपत्ता घालून शिजवा. केस गळण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी खोबरेल तेलात कढीपत्ता शिजवा आणि मेथीचे दाणेही टाका. आठवड्यातून एकदा या तेलाने डोक्याला मसाज करा आणि एक ते दीड तासांनी केस धुवा. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.