मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात फक्त सात धावा करुन बाद झाला. यासोबतच त्याच्या नावे लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
आयपीएलच्या 54 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा पराभव केला.
मुंबईने बंगळुरुचा सहा विकेट्सने दणदणीत पराभव केला. मुंबईकडून सूर्यकुमार यादव, नेहाल वढेरा आणि इशान किशन यांनी चांगली खेळी केली.
सूर्यकुमारच्या 83 धावांच्या झंझावाती खेळीसह मुंबईने हा सामना जिंकला.
दरम्यान, मुंबई संघाने हा सामना जिंकला असला, तरी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माचा डाव थोडक्यात आटोपला.
रोहित शर्मा फक्त सात धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या खेळीसोबतच रोहितच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
आयपीएलच्या इतिहासात रोहित शर्मा त्याच्या कारकिरर्दीत पहिल्यांदा सलग पाच सामन्यांमध्ये एक अंकी धावसंख्येवर बाद झाला आहे.
त्याआधीही रोहित आयपीएल 2017 मध्ये सलग चार सामन्यांमध्ये 10 हून कमी धावसंख्येवर बाद झाला होता.
आयपीएल 2023 मध्ये रोहितने स्वत:च नकोसा विक्रम मोडला आहे.