तिलक वर्माच्या टॅटूने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्याने उजव्या हातावर टॅटू काढला आहे.



सखोल आध्यात्मिक पार्श्वभूमी असलेल्या तिलक वर्माला त्याच्या श्रद्धा आणि अध्यात्माचे प्रतीक असणारा टॅटू काढायचा होता.



तिलक वर्माच्या हातावरील हा टॅटू पूर्ण करण्यासाठी तब्बल सात दिवस लागले.



व्यस्त असल्यामुळे तिलकला हा टॅटू पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ लागला. सात दिवस हळूहळू असा हा टॅटू पूर्ण करण्यात आला.



टॅटू डिझायनर समीर कुरेशी आणि सनी भानुशाली यांनी मिळून तिलक वर्माच्या आवडीनुसार हा खास टॅटू डिझाइन केला आहे.



या टॅटूमध्ये भगवान शंकर आणि श्री गणेश यांची सुंदर कलाकृती साकारण्यात आली आहे.



त्याच्या बायसेपवरील भगवान शंकराचा टॅटू भक्ती, अध्यात्म आणि वैयक्तिक परिवर्तनाची एक शक्तिशाली अभिव्यक्ती याचं प्रतिक आहे.



यासोबतच भगवान शंकराचा हा टॅटू बुद्धी, अध्यात्मिक, प्रबोधन, विश्वाची निर्मिती आणि विनाश यांच्यातील समतोल यासारख्या पैलूंचे प्रतिनिधित्व करतो.



तर हातावरील श्री गणेशाच्या टॅटूमधून अध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.



श्री गणेशाच्या आशीर्वादाने जीवनातील आव्हाने आणि अडथळ्यांवर मात करण्यासाठी मार्गदर्शन मिळावे अशी यामागची आशा आहे.



या सोबतच त्याने छातीवर 'ऊँ नमः शिवाय' टॅटू काढला आहे.



चाहत्यांना तिलक वर्माचा नवीन टॅटू आवडला आहे. सोशल मीडियावर याचीच चर्चा सुरु आहे.