भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीचे जगभरात चाहते आहेत.
विराट कोहली खेळासोबतच त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो.
विराट कोहलीच्या फिटनेस सीक्रेट त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिने सांगितलं आहे.
विराट हा शाकाहारी आहे आणि तो त्याच्या आरोग्याची खूप काळजी घेतो.
उत्तम पौष्टिक आहारासोबतच तो व्यायाम आणि झोपेलाही विशेष महत्त्व देतो.
अनुष्का शर्माने सांगितलं की, विराट कोहली वेळेवर उठतो आणि कार्डिओ करतो. वर्षानुवर्षे त्याचा हा दिनक्रम सुरु आहे.
कार्डिओ हा त्याच्या रोजच्या सवयीचा भाग आहे. कार्डिओनंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा एकत्र क्रिकेट खेळतात.
विराटने गेल्या 10 वर्षांपासून त्याची आवडती डिश बटर चिकनला हातही लावला नाही, असंही अनुष्काने सांगितलं.
विराट त्याच्या आहाराची खूप काळजी घेतो, तो सोडा किंवा कोल्ड्रिंक्ससारखे कोणतेही गोड पेय पीत नाहीत किंवा कोणतेही गोड पदार्थ खात नाहीत.