'हिटमॅन'च्या मुलाचं बारस, या खास नावाचा अर्थ माहितीय?
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा झाला आहे.
15 नोव्हेंबर रोजी रोहित शर्माची पत्नी रितिकाने गोंडस मुलाला जन्म दिल्याची गूड न्यूज शेअर केली.
मुलाच्या जन्मापासूनच चाहते त्याचं नाव जाणून घेण्यासाठी उत्सुक होते.
आता रोहित शर्माच्या मुलाचं बारसं झाल्याची बातमी समोर आली आहे.
आता रितिकाने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना चिमुकल्या बाळाचं नाव सांगितलं आहे.
रोहित शर्मा आणि रितिकाने त्यांच्या मुलाचं नाव 'अहान' ठेवलं आहे.
रितिकाने इंस्टाग्राम पोस्टमध्ये, तिच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या टोपणनावांसह फोटो एका खास पद्धतीने शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये चार लोकांची टोपणनावं लिहिली आहेत, यामध्ये रोहितचं नाव रो, रितिकाचं नाव रित्स, मुलीचं नाव सॅमी आणि मुलाचं नाव अहान लिहिलं आहे.
रोहितच्या लेकीचं नाव 'समायरा' आहे. रोहित आणि रितिकाने बाळाचं युनिक नाव ठेवलं आहे, पण 'अहान' शब्दाचा अर्थ काय?
'अहान' नावाचा अर्थ सूर्योदय आणि सूर्यप्रकाशाचा पहिला किरण असा होतो.