भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू विनोद कांबळी यांना प्रकृती अस्वस्थतेमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Published by: एबीपी माझा वेबटीम

सध्या त्यांच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे.

सोशल मीडियावर विनोद कांबळींच्या प्रकृती अस्वस्थतेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी भावनिक होत त्यांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी तत्काळ कांबळी यांना रुग्णालयात दाखल करून घेतले. सध्या तीन डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत असून त्यांची प्रकृती नियंत्रणात आहे.

विनोद कांबळी यांनी एबीपी माझाशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या.

विनोद कांबळी यांनी जिवंत राहण्याचं कारण सांगितलं.

विनोद कांबळी यांचा हा व्हिडीओ पाहून चाहते पुरते भावूक झाले आहेत. त्यांच्या प्रकृती स्वास्थासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.

मी जिवंत आहे, कारण माझ्यासोबत डॉक्टर्स आहेत, त्यांच्यामुळेच मी जिवंत आहेत, ते जेजे मला सांगतायत, तेते मी करतोय, असं विनोद कांबळी म्हणाले.

विनोद कांबळी यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर विवेक त्रिवेदी यांनी सांगितले की, तपासणीदरम्यान कांबळींच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी दिसल्या. आता मंगळवारी त्याच्या आणखी काही चाचण्या घेण्यात येणार आहेत.

डॉ. त्रिवेदी यांनी असंही उघड केलं की, रुग्णालयाचे प्रभारी डॉ. एस सिंह यांनी कांबळीला आयुष्यभर मोफत उपचार देण्याचं आश्वासन दिलं आहे.

विनोद कांबळी यांची प्रकृती आता ठीक असल्याचं समोर आलं. तसेच विनोद कांबळींच्या मूत्राशयाला संसर्ग झाला असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे, अशी माहिती आकृती रुग्णालयाचे डॉ. शैलेश सिंह ठाकूर यांनी दिली.