World Test Championship 2025 च्या अंतिम फेरीची शर्यत प्रत्येक सामन्यासह अधिक रंजक होत आहे.

Published by: स्नेहल पावनाक

विजेतेपदाच्या सामन्यात स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघ प्रबळ दावेदार मानला जात होता.

Published by: स्नेहल पावनाक

पण टीम इंडियाला घरच्या मैदानावर न्यूझीलंड संघाकडून 3-0 ने पराभवाचा सामना करावा लागला.

Published by: स्नेहल पावनाक

भारताच्या WTC अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या आशा आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अवलंबून आहेत.

Published by: स्नेहल पावनाक

भारताने पर्थमध्ये दणदणीत विजय या दौऱ्याची शानदार सुरुवात केली होती , पण ॲडलेड कसोटीत रोहित शर्माच्या संघाला मोठा पराभव पत्करावा लागला.

Published by: स्नेहल पावनाक

ॲडलेड कसोटीपूर्वी भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर होता, पण आता टींम इंडिया तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.

Published by: स्नेहल पावनाक

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील उर्वरित तीन सामने भारतीय संघाने जिंकले, तर तो कोणत्याही अडचणीशिवाय अंतिम फेरीत प्रवेश करेल आणि कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.

Published by: स्नेहल पावनाक

यासह, भारताचे पीसीटी 64.04 पर्यंत वाढेल. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला 2-0 ने हरवले तरी पीसीटीच्या बाबतीत भारताची बरोबरी करू शकणार नाही.

Published by: स्नेहल पावनाक

पण बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 4-1 ने जिंकण्यात भारताला यश आले नाही तर त्याचा सर्वात मोठा धोका ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेकडून असेल.

Published by: स्नेहल पावनाक

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ चांगली कामगिरी करत आहेत. दक्षिण आफ्रिकाने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर दुसऱ्या कसोटीतही आपले स्थान मजबूत केले आहे.

Published by: स्नेहल पावनाक

जर दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला तर ते 63.33 टक्के गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचेल. त्यामुळे टीम इंडियावर अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर जाण्याची टांगती तलवार आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: CricketGully