भारताचा महान फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गाबा येथे झालेल्या कसोटी सामन्यानंतर आर अश्विनने निवृत्तीची घोषणा केली आहे.
ब्रिस्बेनमधील तिसऱ्या कसोटीनंतर पत्रकार परिषदेत त्याने निवृत्ती जाहीर केली. यानंतर क्रिकेट रसिकांना मोठा धक्का बसला आहे.
अश्विन आतापर्यंत टीम इंडियासाठी उत्तम कामगिरी केली आहे. गोलंदाजीसोबतच त्याने फलंदाजीतही छाप पाडली आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सुरू असताना आज सामना संपताच रविचंद्रन अश्विन निवृत्त होणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या.
सामना अनिर्णित राहण्याची घोषणा होताच, काही वेळाने अश्विन आपला कर्णधार रोहित शर्मासोबत आला आणि त्याने निवृत्तीची घोषणा केली.
आर अश्विन आता एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळणार नाही. मात्र उर्वरित दोन कसोटी सामन्यांमध्येही तो संघासोबत राहील, अशी अपेक्षा आहे.
रविचंद्रन अश्विनने भारतासाठी 106 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याच्या नावावर 537 विकेट्स आहेत.
अश्विनने त्याच्या कारकिर्दीत 37 वेळा 5 विकेट्स आणि 8 वेळा दहा विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला आहे.
त्याने भारतासाठी 116 एकदिवसीय सामने खेळले असून 156 बळी घेतले आहेत.
यासोबत 65 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 72 बळी घेतले आहेत. मात्र, काही काळ अश्विन फक्त कसोटी खेळत होता.