भारताने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं.
या सामन्यात हार्दिक पांड्याने मोलाची कामगिरी केली.
विजय झाल्यानंतर प्रत्येकजण आपल्या पत्नीला व्हिडीओ कॉल करून आपला आनंद साजरा करत होते.
याच काळात हार्दिक पंड्यालाही एक व्हिडीओ कॉल आला.
या व्हिडीओ कॉलमध्ये तो कोणाशीतरी बोलत असल्याचे दिसतेय.
खाली मैदानावर बसून तो हा संवाद करतोय.
या व्हिडीओ कॉलचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
याच फोटोंचा आधार घेत नताशा आणि पांड्या यांच्यात व्हिडीओ कॉल चालू होता, असा दावा केला जातोय.
खरं म्हणजे हार्दिक नेमकं कोणाशी बोलत होता, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.
दोघांच्या नात्यात कसलीही नाराजी नाही, असे म्हणत पांड्याच्या चाहत्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.