मुंबई इंडियन्सने सुरुवातीचे पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघावर 8 विकेट्सने विजय मिळवला.

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व केले होते.

Image Source: PTI

मुंबई इंडियन्स संघाचा चौथा सामना लखनऊमध्ये खेळला जाणार आहे.

Image Source: PTI

शुक्रवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना लखनऊमधील इकाना स्टेडियमवर खेळला जाईल.

Image Source: PTI

या सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादव, दीपक चाहर, तिलक वर्मा आणि संघातील इतर अनेक खेळाडू अयोध्याच्या राम मंदिरात पोहोचले.

Image Source: Instagram

देशाच्या कानाकोपऱ्यातून रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत असताना, आता मुंबई इंडियन्सचे शिलेदारही रामलल्लाच्या दर्शनासाठी आतुर झाल्याचं दिसून आलं.

Image Source: Instagram

सूर्यकुमार यादव यांनी आपल्या पत्नीबरोबरचा फोटो शेअर केला आहे.

Image Source: Instagram

दीपक चाहरची पत्नी, जया भारद्वाजने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे.

Image Source: Instagram

फोटोमध्ये टिळक वर्मा आणि करण शर्मा देखील दिसत आहे.

Image Source: Instagram