टीम इंडियाच्या गोलंदाजीचं नेतृत्त्व करणाऱ्या जसप्रीत बुमराहनं पत्नी संजना गणेशनला विजयाच्या आनंदात मिठी मारली.
भारतानं आयसीसी टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत विजेतेपद मिळवलं.
भारतानं या विजेतेपदासह आयसीसी ट्रॉफी विजयाचा गेल्या 11 वर्षांचा दुष्काळ संपवला.
जसप्रीत बुमराहनं टी 20 वर्ल्ड कपच्या 8 मॅचेसध्ये 15 विकेट घेतल्या.
यामुळं त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट पुरस्कार देऊन बुमराहचा गौरव करण्यात आला.
त्यापूर्वी भारतानं दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत केल्यानंतर सर्व खेळाडूंनी जल्लोष केला.
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन देखील टीम इंडियाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली होती.
जसप्रीत बुमराहनं संजना गणेशनला मिठी मारुन विजयाचा आनंद साजरा केला.
जसप्रीत बुमराहनं मॅच संपल्यानंतर संजनाला मुलाखत दिली.
आज माझ्याकडे शब्द नाहीत. मॅचनंतर रडत नाही पण आज भावना अनावर झाल्या, असं बुमराहनं म्हटलं.