आयपीएलला मिळणार नवा विजेता, बंगळुरूसमोर अंतिम सामन्यात पंजाबचं आव्हान;

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

पंजाबची मुंबई इंडियन्सवर पाच विकेट्सनी मात, श्रेयस अय्यरची खेळी निर्णायक

Image Source: PTI

पंजाब किंग्सनं क्वालिफायर टू सामन्यात मुंबई इंडियन्सचा पाच विकेट्सनी पराभव करून, दुसऱ्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली.

Image Source: PTI

मुंबईनं विजयासाठी दिलेलं २०४ धावांचं आव्हान पंजाबनं सहा चेंडू राखून पार केलं.

Image Source: PTI

त्यामुळं यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब अशी फायनल पाहायला मिळेल.

Image Source: PTI

या दोन्ही संघांनी एकदाही आयपीएल जिंकलेली नाही, हे विशेष.

Image Source: PTI

कर्णधार श्रेयस अय्यरनं ४१ चेंडूंत केलेली नाबाद ८७ धावांची खेळी पंजाबच्या विजयात निर्णायक ठरली

Image Source: PTI

श्रेयसनं निहाल वढेराच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी रचलेली ८४ धावांची भागीदारी मोलाची ठरली.

Image Source: PTI

मुंबईकडून जॉनी बेअरस्टोनं ३८, तिलक वर्मानं ४४, सूर्यकुमार यादवनं ४४ आणि नमन धीरनं ३७ धावांची धडाकेबाज खेळी उभारली.

Image Source: PTI