01 नोव्हेंबर 2024 पासून भारत-न्यूझीलंडचा 3 कसोटी सामना मुंबईचा वानखेडे स्टेडियममध्ये खेळण्यात येत आहे.
सामन्यासाठी खरेदी केलेल्या तिकिटांमध्ये बनावट तिकीटांचा फटका अनेक प्रेक्षकांना बसला आहे.
अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडिया आणि इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून तिकिटे विकत घेतली.
अधिकृत तिकिटांवर केवळ स्टँडची माहिती देऊन कोणालाही कोणत्याही सीटवर बसण्याची मुभा होती.
मात्र, बनावट तिकिटांवर सीट नंबरही नमूद केले होते.
मुंबई क्रिकेट संघटनेने (MCA) सोशल मीडियावर पोस्ट करून बनावट तिकिटे विक्रीपासून सावध राहण्याचा इशारा दिला.
एमसीएने केवळ एकाच कंपनीला अधिकृत तिकीट विक्रीची परवानगी दिली होती.
बनावट तिकिटांमुळे प्रेक्षकांची फसवणूक होत असून, तिकिट खरेदी करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत स्रोतावरच विश्वास ठेवावा.