दरम्यान, विराट कोहलीची एक चूक टीम इंडियाला मोठी महागात पडली.
विराटच्या एका चुकीमुळे ऋषभ पंत दुसऱ्या डावात धावबाद झाला आणि त्याला आपले खातेही उघडता आले नाही.
खरंतर, कोहलीने धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या प्रयत्नात ऋषभ पंतने विकेट गमावली.
ऋषभ पंत धावबाद होताच किवी संघाने या सामन्यात विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.
भारतीय संघाचे 23 वे षतक सुरु असतांना विराट कोहली स्ट्राइकवर होता.
कोहलीने ओव्हरचा दुसरा चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने खेळला आणि तिथे किवी संघाचा मिचेल सँटनर होता.
चेंडू थेट मिचेल सँटनर हातात गेला आणि कोहली धावा काढण्यासाठी धावला.
पण ऋषभ पंत पोहोचू शकला नाही आणि सँटनरने त्याला धावबाद केले.