चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे.
कोरोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.
तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.
एशिया टाइम्सने हेल्थ एक्सपर्ट्सच्या अहवालानुसार माहिती दिली आहे की,
गेल्या एका महिन्यामध्ये चीनमधील सुमारे 40 टक्के नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
चिनी महामारी विशेष तज्ज्ञ झेंग गुआंग यांनी सांगितले आहे की,
चीनमधील बहुतेक शहरांमध्ये 50 टक्के लोकांना कोविड -19 संसर्ग झाला आहे.
त्यामुळे गेल्या महिन्यात चीनमधील सुमारे 40 टक्के लोकसंख्या कोरोना संक्रमित झाली आहे.
हा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
जगभरात 665 दशलक्ष लोकांना कोरोनाचा संसर्ग!