मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगनं अनेकांना कोरोनापासून दूर ठेवलं आहे.
एका सर्वेक्षणानुसार असा दावा करण्यात आला आहे की, भारतात 10 पैकी 8 कुटुंबं सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावल्यामुळं कोरोना प्रादुर्भावापासून बचावली आहेत.
हे सर्वेक्षण लोकल सर्कलनं भारतातील 345 जिल्ह्यांमध्ये केलं आहे. याक जवळपास 29 हजार लोकांनी सहभाग घेतला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
अनेक राज्यांनी कोरोनाचे निर्बंध काढल्यानंतर हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे.
लोकल सर्कलनं दावा केला आहे की, या सर्वेक्षणातून असं समोर आलं आहे की, 57 टक्के भारतीय कुटुंबातील कमीत कमी एक किंवा दोन लोकांना गेल्या दोन वर्षात कोरोना झाला आहे.
मास्क लावल्यामुळं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन केल्यामुळं कोरोनाला आटोक्यात आणण्यात यश आलं असल्याचं म्हटलं आहे.
10 पैकी 8 कुटुंबं सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावल्यामुळं कोरोना प्रादुर्भावापासून बचावली.
त्यांच्या परिवारातील कुठलाही सदस्य कोरोनाबाधित झाला नाही कारण त्यांनी कोरोना नियमांचं काटेकोर पालन केलं.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 53 टक्के लोकांनी सांगितलं की, त्यांनी महामारीच्या काळात आपली दिनचर्या व्यवस्थित पाळली, तसेच घरामध्ये सक्रिय राहत व्यायामावर लक्ष केंद्रीत केलं.