सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्री साई पल्लवीचा आज (9 मे) वाढदिवस आहे. आज ती तिचा 30वा वाढदिवस साजरा करत आहे. साई पल्लवीचा जन्म 9 मे 1992 रोजी तामिळनाडूमध्ये झाला होता. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कस्तुरी मान' या तमिळ चित्रपटातून बालकलाकार म्हणून तिने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. साई पल्लवीला कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. तिला कार्डिओलॉजिस्ट व्हायचं होतं. तिच्याकडे वैद्यकीय पदवीही आहे. आभिनेत्री साई पल्लवी नेहमीच तिच्या क्यूटनेससाठी ओळखली जाते. सई पल्लवी ही एकमेव दक्षिण भारतीय अभिनेत्री आहे जी, नेहमी मेकअपच्या विरोधात असते. एकदा साई पल्लवीला फेअरनेस क्रीमच्या दोन कोटींच्या जाहिरातीची ऑफर देण्यात आली होती. पण, तिने फेअरनेस क्रीमची जाहिरात करण्यास साफ नकार दिला होता. सईच्या मते, जे नैसर्गिक आहे तेच सौंदर्य आहे. तिला अशा कोणत्याही गोष्टीचा प्रचार करायचा नाही, ज्यामुळे लोकांमध्ये चुकीचा समाज पसरेल. साईच्या या निर्णयाचे त्यांचे खूप कौतुक झाले होते.