देशातील कोरोना संसर्गाचा आलेख घटताना पाहायला मिळत आहे सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाली आहे देशात गेल्या 24 तासांत 3157 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 19 हजार 500 वर पोहोचली आहे रविवारी दिवसभरात 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे काल देशात 3324 नवीन कोरोनाबाधितांची नोंद आणि 40 जणांचा मृत्यू झाला देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 500 इतकी झाली आहे रविवारी दिवसभरात देशात 2723 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 38 हजार 976 जण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत गेल्या 24 तासांत 50 कोरोनो रुग्णांचा मृत्यू झाला आहे भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 23 हजार 843 झाली आहे