भारतात कोरोनाचा धोका पुन्हा वाढताना दिसत आहे



देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 828 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे



केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार देशात नव्या कोरोना बाधितांची संख्या वाढली असून सक्रिय रुग्णांच्या संख्येतही भर पडली आहे



आधीच्या दिवशी 2658 नवी कोरोनाबाधित रुग्ण आणि 33 रुग्णांचा मृत्यू झाला होता



गेल्या 24 तासांत झालेल्या 14 रुग्णांच्या मृत्यूंसह देशातील कोरोना बळींची संख्या 5 लाखांच्या पुढे गेली आहे



आतापर्यंत देशात कोरोनामुळे 5 लाख 24 हजार 586 रुग्णांचा मृत्यू झालाा आहे



देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्याही 17 हजारांवर पोहोचली आहे



आरोग्य मंत्रालयाच्या नव्या आकडेवारीनुसार, सध्या देशात 17 हजार 87 रुग्णांवर पोहोचली आहे



आदल्या दिवशी हा आकडा 16 हजारांवर होता. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 035 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे



देशात आतापर्यंत कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 26 लाख 11 हजार 370 वर पोहोचली आहे