देशातील कोरोना संसर्गातील चढउतार कायम आहे



देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 706 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 25 जणांचा मृत्यू झाला आहे



ही संख्या आधीच्या दिवसाच्या तुलनेत घसरल्याचं दिसून येत आहे



नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाली आहे



आधीच्या दिवशी 2828 नवे कोरोना रुग्ण आणि 14 जणांचा मृत्यू झाला



देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 17 हजारांवर पोहोचली आहे



सध्या भारतात 17 हजार 698 इतके कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत



देशात रविवारी दिवसभरात म्हणजेच गेल्या 24 तासांत 2 हजार 70 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत



देशात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4, कोटी 26 लाख 13 हजार 440 वर पोहोचली आहे



भारतात आतापर्यंत कोरोनामुळे 5 लाख 24 हजार 611 रुग्णांचा मृत्यू झाला आहे