देशातील कोरोना संसर्गात हळूहळू घट होताना दिसत आहे



आधीच्या दिवसाच्या तुलनेत आज नवीन कोरोनाबाधितांमध्ये काहीशी घट झाली आहे



गेल्या 24 तासांत 2 हजार 685 नवीन रुग्ण कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 33 जणांचा मृत्यू झाला आहे



केंद्रीय मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 16 हजारांवर पोहोचली आहे



देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 158 कोरोना रुग्ण संसर्गातून बरे झाले आहेत



आतापर्यंत देशात कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 26 लाख 9 हजार 335 इतकी झाली आहे



देशात सध्या सक्रिय रुग्णांचा दर 0.04 टक्के झाला आहे



देशातील सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 16 हजार 308 एवढी पोहोचली आहे



देशात आतापर्यंत 84 कोटीहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत



देशात गेल्या 24 तासांत चार लाख 47 हजार 637 नमुने तपासण्यात आले आहेत