देशातील कोरोना संसर्गाचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे



देशात गेल्या 24 तासांत 2,593 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे



शनिवारी दिवसभरात 1755 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे



काल भारतात कोरोनाचे 2,527 नवे रुग्ण आणि 33 रुग्णांचा मृत्यू झाला



देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजार 873 इतकी झाली आहे



शनिवारी दिवसभरात देशात 1755 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत



भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 22 हजार 193 इतकी झाली आहे



देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 19 हजार 479 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत



शनिवारी दिवसभरात देशात 19 लाख 13 हजार 296 कोरोना लसी देण्यात आल्या



भारतात आतापर्यंत 187 कोटी 46 लाख 72 हजार 536 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत