अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूरनं काही दिवसांपूर्वी लग्नगाठ बांधली.



आलियानं लग्नामधील तिचे काही खास फोटो शेअर केले आहे.



आलियानं तिचे ब्रायडल लूकमधील फोटो शेअर करून त्याला 'कॅट ऑफ ऑनर' असं कॅप्शन दिलं आहे.'



आलियानं शेअर केलेल्या फोटोमध्ये आलियासोबत तिची मांजर एडवर्ड देखील दिसत आहे.



आलियानं रणबीर आणि तिचे लग्नसोहळ्यातील काही खास फोटो देखील शेअर केले होते.



फोटोमधील आलिया आणि रणबीरच्या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली होती.



आलियानं लग्नामध्ये डिझायनर सब्यसाचीनं डिझाइन केलेली साडी नेसली होती.



अनेक सेलिब्रिटींनी आलिया आणि रणबीरच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली.



आलिया आणि रणबीर एकमेकांना पाच वर्ष डेट करत होते.



लवकरच त्यांचा ब्रम्हास्त्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.