भारतातील कोरोना विषाणू संसर्गाचा वेग मंदावल्याचं पाहायला मिळत आहे देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 338 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे आधीच्या दिवशी 2706 कोरोना रुग्णांची नोंद आणि 25 रुग्णांचा मृत्यू झाला होता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवी आकडेवारी जारी करत ही माहिती दिली आहे देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच सोमवारी दिवसभरात 2 हजार134 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत कोरोना महामारी सुरु झाल्यापासून देशात आतापर्यंत 4 कोटी 26 लाख 15 हजार 574 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.74 टक्के आहे गेल्या 24 तासांत 19 कोरोना रुग्णांनी प्राण गमावला आहे कोरोनामुळे आतापर्यंत 5 लाख 24 हजार 630 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे