देशात गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाली आहे



देशात मागील 24 तासांत 18 हजार 257 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे



शनिवारी दिवसभरात 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे



शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी महाराष्ट्रातील कोरोनाची रुग्णसंख्या काहीशी कमी झाल्याचं दिसून आलं आहे



राज्यात महाराष्ट्रातील 2760 नव्या रुग्णांची भर पडली असून 2934 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर, पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे



शनिवारी दिवसभरात 14 हजार 553 कोरोना रुग्णांनी विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे



महामारी सुरु झाल्यापासून आतापर्यंत 4 कोटी 29 लाख 68 हजार 533 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे



देशव्यापी कोरोना लसीकरणात आतापर्यंत 198 हून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत



मागील 24 तासांत 42 रुग्णांचा मृत्यू आहे



भारतात एकूण 5 लाख 25 हजार 428 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे



मुंबईत शनिवारी 499 रुग्णांची नोंद झाली आहे



मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शनिवारी 811 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे