मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे.

बऱ्याच काळापासून आटोक्यात आलेल्या रुग्णसंख्येने आता पुन्हा वाढण्यास सुरुवात झाल्याने सर्वांची चिंता वाढली आहे.

पण गुरुवारच्या तुलनेत आज रुग्णसंख्येत घट आढळून आली आहे.

गुरुवारी 2479 नवे बाधित आढळले होते तर आज 1898 नव्या बाधितांची नोंद झाल्याने 581 कमी नवे बाधित आढळल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

रुग्णसंख्या सतत वाढत असल्याने पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून नागरिकांनाही काळजी घेणं अनिवार्य झालं आहे.

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शुक्रवारी 1 हजार 898 नवे कोरोनाबाधित आढळले असून 2253 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईत दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर पोहोचला आहे.

रुग्ण दुपटीचा दरही वाढत असल्याने चिंतेचं कारण आणखी वाढलं आहे.

आज राज्यात 4205 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे.