देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाली आहे सोमवारी दिवसभरात देशात 13 हजार 086 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 24 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे मृत्यू झाला आहे भारताता आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाच लाखांच्या पुढे पोहोचली आहे सक्रिय रुग्णांची संख्याही एक लाखाच्या पुढे गेली आहे रविवारच्या तुलनेनं सोमवारी नोंद झालेल्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे रविवारी देशात 16 हजार 135 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता देशात मागील 24 तासांत 12 हजार 456 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत कोरोना महामारी सुरु झाल्यास देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 28 लाख 91 हजार 933 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे देशात आतापर्यंत 5 लाख 25 हजार 223 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत