एकीकडे नव्या कोरोना व्हेरियंटने चिंता वाढवली असताना देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतही वाढ झाली आहे.
देशात 2 हजार 141 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची नवीन आकडेवारी जारी केली आहे.
कालच्या तुलनेत आज 81 रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे. ही वाढ जरी किंचित असली, तरी देशात आधीच कोरोनाच्या नव्या प्रकाराने डोकं वर काढलं आहे. अशात कोरोना आकडेवारीतील वाढ चिंताजनक आहे.
कोरोनाच्या नवा व्हेरियंट ओमायक्रॉन BF.7 विषाणूचा पहिला रुग्ण भारतात आढळून आला आहे.
चीनमध्ये काही दिवसांपूर्वी BF.7 या ओमायक्रॉन विषाणूचा सबव्हेरियंट आढळला होता.
भारतातही गुजरातमधील अहमदाबादमध्ये BF.7 व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळला आहे.
कोरोनाचा हा नवा व्हेरियंट अतिशय संसर्गजन्य असल्याचं म्हटलं जातं आहे
एकीकडे देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे, तर दुसरीकडे सक्रीय रुग्णांचा आकडा 26 हजारांवर कायम आहे.
12 ऑक्टोबरपासून सक्रीय रुग्णांची संख्या 26 हजारांवर कायम आहे. त्याआधी सक्रिय रुग्णांच्या संख्येत सतत घट पाहायला मिळत होती.
देशात नव्याने नोंद झालेल्या दोन हजार 141 रुग्णांमुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची आकडेवारी 4 कोटी 46 लाख 36 हजार 517 वर पोहोचली आहे.
यापैकी 4 कोटी 40 लाख 68 हजार 557 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.